आपल्या वरिष्ठांच्या उपस्थितीतच लाच घेण्याची अशी ही शक्कल पिंपरी चिंचवडमधील एका महिला वाहतूक पोलिसाने शोधून काढली. मात्र,एका सतर्क तरुणाच्या मोबाईलने शहर बाजारपेठेच्या शगून चौकातील ही आयडियाची कल्पना काल टिपली. दरम्यान, याप्रकरणी चौकशीनंतर सबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,असे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी आज सरकारनामाला सांगितले.